नवी दिल्ली : 'एम्स'मध्ये राहुल गांधी आणि लालू यादवांची भेट
Continues below advertisement
चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एम्समध्ये जाऊन लालू प्रसाद यांची भेट घेतलीय. यावेळी राहुल यांनी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट महत्त्वाची मानली जातेय. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या राहुल गांधींना राष्ट्रीय जनता दलाकडून पाठिंबा मिळताना दिसतोय.
याआधी लालू यादव रांचीमधील तुरुंगात होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रांचीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांना एम्समध्ये हलवण्यात आलं.
याआधी लालू यादव रांचीमधील तुरुंगात होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रांचीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांना एम्समध्ये हलवण्यात आलं.
Continues below advertisement