Ram Nath Kovind | अस्थितरतेच्या आणि निराशेच्या वातावरणातून देश बाहेर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद संपूर्ण अभिभाषण | ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संबोधित केलं. सेंट्रल हॉलमध्ये संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी मोदी सरकार 2 चा पुढील पाच वर्षांचा अजेंडा मांडला. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हे आपलं लक्ष्य असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. जलसंकट, शेतकरी आणि छोट्या उद्योगपतींचा उल्लेख करत सरकार त्यांच्यासाठी पावलं उचलण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही कोविंद यांनी दिली. शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.