नवी दिल्ली : 'आप'ला धक्का, 20 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर, राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

Continues below advertisement
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवडणूक आयोगाची शिफारस मान्य केली आहे. आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांचं सदस्यत्त्व राष्ट्रपतींच्या मंजुरीने रद्द करण्यात आलं आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी करुन, आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवलं आहे.

आपने आपल्या 21 आमदारांना संसदीय सचिवपद दिलं आहे. ही सर्व लाभाची पदं आहेत. त्यामुळे या आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत पटेल यांनी मार्च 2015 मध्ये राष्ट्रपतींकडे याचिकेद्वारे केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram