
नवी दिल्ली : सीबीएसईच्या पेपरफुटीवर केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने पेपरफुटीमुळे मोठा निर्णय घेतला आहे. दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा फुटलेला पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे. दहावीचा गणिताचा पेपर आज झाला, तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर काल झाला होता. या परीक्षांची तारीख अद्याप जाहीर झाली नसून थोड्याच दिवसात सीबीएससीच्या संकेतस्थळावर त्याची माहिती दिली जाणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून बोर्डाने दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. राज्यात दहावी, बारावी बोर्डाचे पेपरफुटीच्या घटना समोर आल्या होत्या. आता सीबीएस बोर्डाचेही पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement