नवी दिल्ली : जेईई मेन आणि नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार
यावर्षीपासून नीट आणि जेईई मेन परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार आहेत. तशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. नीटची परीक्षा फेब्रुवारी आणि मे तर जेईईची परीक्षा जानेवारी आणि एप्रिल महिन्यात होणार आहेत. सध्या या परीक्षा सीबीएससी बोर्डाकडून घेण्यात येते. मात्र, आता ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेतल्या जाणार आहेत.