नवी दिल्ली : हरीभाऊ बोला काय म्हणताय? पंतप्रधान मोदींचा लाभार्थ्याशी मराठीतून संवाद

Continues below advertisement
मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील नाशिकच्या व्यक्तीशी मराठीत संवाद साधला. त्यामुळे मुद्रा योजनेचे लाभार्थी असणारे हरी गनोर ठाकूर यांच्यासह सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

केंद्रातील भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुद्रा योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी बातचीत केली. विशेष म्हणजे मोदींनी सहज आणि सोप्या शैलीत हरी ठाकूर यांच्याशी संवाद साधला. मात्र या लाभार्थ्याला मराठी येत नसल्याने, पुढील संवाद हिंदीतच झाला.

मोदी सरकारने एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत देशभरात लहान-मोठ्या व्यवसायांना लाखो, कोट्यवधी रुपयांचं कर्ज दिलं. पंतप्रधानांनी मंगळवारी सहकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅप आणि व्हिडीओ कॉन्‍फ्रन्सिंगद्वारे मुद्रा योजनेच्या लाभार्थ‍ींशी संवाद साधला.

या योजनेमुळे माझं आयुष्य बदलल्याचं हरी गनोर ठाकूर यांनी सांगितलं. तर दुसरीकडे मुद्रा योजनेअंतर्गत सर्वाधिक कर्ज महिला, तसंच गरीब दलित नागरिकांना मिळाल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram