नवी दिल्ली : सॅनिटरी पॅड करमुक्त, अर्थमंत्री पियुष गोयल यांची घोषणा

Continues below advertisement
आज झालेल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत महिलांना मोठा दिलासा देण्यात आलाय. महाराष्ट्र सरकारच्या मागणीला मान्यता देत सॅनिटरी नॅपकिन्स वरील जीएसटी रद्द करण्यात आलाय. जीएसटी लागू झाल्यानंतर सॅनिटरी नॅपकीन्सवर 12 टक्के जीएसटी आकारला जायचा, मात्र स्त्रीयांची मुलभूत गरज असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लावल्यानं महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर महिलांच्या रोषासमोर सरकारनं नमत घेत, सॅनिटरी नॅपकिन्सवरील जीएसटी रद्द करण्यात आलाय.
याशिवाय 28 टक्के जीएसटी गटात असणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे. दरम्यान जीएसटी काऊन्सीलची पुढील बैठक ४ ऑगस्टला केरळमध्ये होणार आहे. त्या बैठकीत अजून काय महत्वाचे निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram