नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांकडून अविश्वास ठरावाची नोटीस, दोन्ही सदनं तहकूब

Continues below advertisement
मोदी सरकारविरोधात चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसनं नव्यानं नोटीसही दिलीय. आता आज लोकसभेत काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. याच मुद्द्यांवरुन लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. राज्यसभेचं कामकाज उद्या 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. केंद्र सरकारविरोधात आंध्र प्रदेशच्या सदस्यांनी दिलेल्या अविश्वास प्रस्तावाला समर्थन देण्याचे संकेत बिजू जनता दलाने दिले आहेत. मात्र या प्रस्तावावेळी शिवसेना तटस्थ राहिल, असं शिवसेनेनं याआधीच जाहीर केलेलं आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्दयावरुन तेलगू देसमच्या खासदारांनी
राजीनामे देत चंद्रबाबूंचा पक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram