New Motor Vehicle Act | कायदा समितीत असताना रावतेंचा आक्षेप का नाही? : नितीन गडकरी | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्रात, म्हणजे नितीन गडकरींच्याच राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीला राज्य सरकारनं ब्रेक लावलाय. विधानसभेच्या तोंडावर नव्या वाहन मोटार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं नकारघंटा वाजवली आहे. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी पत्रकार परिषद घेत गडकरींनी सुधारणा केलेल्या कायद्याबाबत तटस्थ राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळं तूर्तास राज्यात जुन्या आरटीओ नियमांप्रमाणेच दंडवसुली सुरू राहणार आहे.. दरम्यान दंडाच्या रकमेच्या फेरविचाराची मागणी करणारं पत्र रावतेंनी नितीन गडकरींना पाठवलंय. दरम्यान वाहन कायद्यातील सुधारणेसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये दिवाकर रावतेही होते, त्यावेळी त्यांनी आक्षेप का घेतला नाही असा सवाल गडकरींनी उपस्थित केलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram