नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम

Continues below advertisement
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. तीन आरोपींनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या प्रकरणातील चौथ्या आरोपीने पुनर्विचार याचिका दाखल केली नव्हती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता तिन्ही आरोपींना फाशी होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. आरोपींना आता राष्ट्रपतींकडून माफी मिळवण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उरला नाही. आजच्या सुनावणीला निर्भयाचे आई-वडील आणि वकील न्यायालयात उपस्थित होते.
या प्रकरणी पवन, मुकेश, विनय आणि अक्षय या चार दोषींना दिल्ली सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram