नवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयातल्या चार न्यायमूर्तींची मीडियासमोर तक्रार
Continues below advertisement
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्थेच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्टाचं कामकाज व्यवस्थितपणे चालत नाही असाच कारभार चालला तर लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी भीती यावेळी न्यायमूर्तींनी व्यक्त केली. विशेष म्हणजे 2 महिन्यांपूर्वी याविषयी सरन्यायाधीशांकडे तक्रार करुनही उपयोग झाला नसल्याची खंत न्यायमूर्तींनी व्यक्त केली. सरन्यायाधीश दीपक मिश्रानंतर सेवाज्येष्ठनेनुसार ज्येष्ठ असलेले न्यायामूर्ती चेलमेश्वर यांच्या घरी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती जोसेफ कुरिअन, रंजन गोगोई आणि मदन लोकुरही उपस्थित होते. यानंतर न्यायामूर्ती शरद बोब़डे आणि न्यायामूर्ती नागेश्वरा यांनीही 4 न्यायमूर्तींना नैतिक पाठिंबा दिला. विशेष म्हणजे सेवाज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती गोगोईंनंतर सरन्यायाधीशपदी शरद बोबडेंची वर्णी लागू शकते. त्यामुळे बोबडेंच्या धडाडीचं कौतुक होतं.
Continues below advertisement