नवी दिल्ली : 'त्या' 23 दिवसांचं वेतन, भत्ता एनडीए खासदार स्वीकारणार नाहीत!
Continues below advertisement
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधीवेशनात काँग्रेससह इतर पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळे 23 दिवसांचं कामकाज होऊ शकलं नाही. त्यामुळे भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी या कामकाज होऊ न शकलेल्या 23 दिवसांचं वेतन आणि भत्ते स्वीकारणार नसल्याचं जाहीर केलं आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. 29 जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र आतापर्यंत अनेक वेळा संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ आणि त्यामुळे सभागृह ठप्प झालेलं पाहायला मिळालं. मंत्री अनंतकुमार यांनी काँग्रेसच्या राजकारणामुळे राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज झालं नसल्याचा आरोप यावेळी केला.
Continues below advertisement