नवी दिल्ली : भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार? नाना पटोलेंचाही जागेवर दावा
Continues below advertisement
भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ही जागा आपणच लढवणार असल्याचं जाहीर केलं. मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडायची की नाही, याबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेतील, असं काँग्रेसच्या नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
एकीकडे ही जागा आपणच लढवणार असल्याचं राष्ट्रवादीने जाहीर केलं आह, तर काँग्रेसनेही या जागेवरचा आपला दावा कायम ठेवला आहे. नाना पटोले राहुल गांधींची भेट घेणार आहेत. त्यानंतर ही जागा नेमकी कोण लढवणार, याबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, निवडणूक कुणीही लढवली तरी भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र लढू, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.