नवी दिल्ली : खरीप हंगामातील 14 पिकांचा हमीभाव दीडपट वाढवला!
Continues below advertisement
मोदी सरकारने देशातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खरीप हंगामातील 14 पिकांचा हमीभाव दीडपट वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार ग्रामीण भागातील बँकांमध्ये पैशांची गुंतवणूक करणार आहे. तर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने किसान कार्ड टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Continues below advertisement