नवी दिल्ली : सरासरीच्या 97 टक्के पाऊस होणार, हवामान खात्याचा दुसरा अंदाज
Continues below advertisement
आता केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर हवामान विभागानं पुन्हा एकदा मान्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केलाय... हवामान विभागानं यंदा सरासरीइतका पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.. जून ते सप्टेंबर या 4 पावसाळी महिन्यांमध्ये संपूर्ण देशात सरासरी ९७ टक्के पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली आहे... हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर - पश्चिम भारतात १०० टक्के पाऊस तर मध्य भारतात 99 टक्के पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे...
तर, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं यंदा मान्सून हा नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच दाखल झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे 6,7 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी तज्ज्ञांना आशा आहे.