नवी दिल्ली : मुख्यमंत्री बदलले तर सरकारचा पाठिंबा काढू : आमदार रवी राणा

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवल्यास शिवसेनेसोबत राहणं कठीण आहे, त्यामुळे एका मिनिटात सरकार पडेल, असा अंदाज अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. आमदार रवी राणा यांनी दिल्लीत एबीपी माझाशी खास बातचित केली.

मुख्यमंत्र्यांच्या समर्थनासाठी अपक्ष आमदार रवी राणा मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांना पटवलं तर सहा अपक्ष एकाच वेळी राजीनामा देतील, असा इशारा रवी राणा यांनी याआधीच दिला आहे.

शिवाय, मुख्यमंत्री हटवण्याची चर्चा कुठून सुरु झाली माहिती नाही, पण गरज पडल्यास भाजपच्या हायकमांडनाही भेटून या तीव्र भावना कळवू, असेही रावी राणा यांनी सांगितले.

“महाराष्ट्रातलं युतीचं सरकार टिकून आहे ते केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. त्यामुळे मुख्यमंत्री हटवण्याचे कारस्थान कोणाचा आहे माहिती नाही, कदाचित पक्षातले लोक सुद्धा असू शकतील. पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेमागे ठाम आहोत.”, असे आमदार रवी राणा म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola