नवी दिल्ली : महाराष्ट्र सुरक्षा बल संपावर, राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सुरक्षा वाऱ्यावर
Continues below advertisement
मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा या घडीला वाऱ्यावर आहे का? असा प्रश्न पडू लागला आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल कंपनीचे सुरक्षा रक्षक संपावर गेले आहेत. प्रामुख्यानं सकाळच्या शिफ्टच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. ज्यामुळे मेट्रो, विमानतळ, मोनो रेल, अनेक देवस्थानं याठिकाणच्या सुरक्षेवर प्रश्न उभे राहिले आहेत. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महाराष्ट्रातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दिल्लीतील युनिटनंही कामबंद आंदोलन पुकारलं. महाराष्ट्र सदनात सुरक्षेसाठी तैनात असलेले 45 जवान संपावर गेले आहेत. आज दुपारी 2 नंतर एकही जवान ड्युटीवर नाही.
पोलिसांचा दर्जा द्या, नोकरीत कायम करा आणि पगारवाढ द्या अशा प्रमुख मागण्या सुरक्षा रक्षकांनी केल्या आहेत.
Continues below advertisement