नवी मुंबई : कुलभूषण जाधव प्रकरणावरुन लोकसभेत घोषणाबाजी
Continues below advertisement
कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे लोकसभेतही गोंधळ झाला. लोकसभेचं काम सुरु होताच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरुच ठेवला. पण त्यानंतरही गोंधळ वाढला. त्यामुळे अखेर अर्ध्या तासासाठी कामकाज ठप्प झालंय. दरम्यान, उद्या कुलभूषण यांच्या कुटुंबियांना मिळालेल्या वागणुकीबाबत भारताची काय भूमिका असेल, भारत त्याला कशाप्रकारे उत्तर देईल., यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उद्या उत्तर देणार आहेत.
Continues below advertisement