मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा, काँग्रेसची लोकसभेत मागणी
Continues below advertisement
पंजाब नॅशनल घोटाळ्यात दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी आज लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ बघायला मिळाला. कामकाज सुरु होताच काँग्रेससह विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये उतरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर कामकाज तासाभरासाठी तहकूब केलं. पुन्हा दुपारी कामकाजाला सुरुवात झाली तरीही गदारोळ सुरु होता. त्यामुळे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं. तर तिकडे राज्यसभेतही विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर विरोधकांनी संसद परिसरामध्ये येऊन घोषणाबाजी केली.
Continues below advertisement