नवी दिल्ली : कर्नाटकातील शपथविधीसाठी कुमारस्वामींचं राहुल-सोनिया गांधींना निमंत्रण
जनता दल सेक्युलर चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी आज संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी दोघांनाही कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान, कुमारस्वामींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधीसोबत कर्नाटक सरकारमधील मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली. कर्नाटकमध्ये एकजुटीने काम करु, तसेच राज्यात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर हे पक्ष एक स्थिर सरकार देतील, असंही त्यांनी सांगितलं.