नवी दिल्ली : कोरेगाव-भीमा प्रकरणी मोदींनी मौन सोडावं : जिग्नेश मेवाणी
Continues below advertisement
स्वत:ला दलितांचे नेते म्हणवणारे पंतप्रधान कोरेगाव भीमाच्या हिंसाचारावर का बोलत नाहीत? असा सवाल गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. आपल्यावर बिनबुडाचे आरोप करुन गुन्हे दाखल करणं हा दलितांचा अपमान आहे. आपण कुठलंही प्रक्षोभक भाषण केलं नाही. कोरेगाव-भीमाला भेट दिली नाही. बंदमध्ये सहभागी झालो नाही. तरीही गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? असा प्रश्नही मेवाणींनी विचारला.
Continues below advertisement