नवी दिल्ली : अण्णा हजारेंच्या सर्व मागण्या मान्य, मात्र विसंवादातून अण्णांचं आंदोलन : गिरीश महाजन

Continues below advertisement
अण्णांनी आंदोलन मागे घ्यावं, यासाठी सरकारकडून मध्यरात्रीपर्यंत वाटाघाटी सुरु होत्या.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल रात्री अण्णा हजारे यांच्याशी महाराष्ट्र सदनात चर्चा केली.

कृषी मूल्य आयोगास स्वायत्तता देण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे. पण इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यावर अण्णा ठाम आहेत.

अण्णा महाराष्ट्रातून दिल्लीला रवाना होण्याआधी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोनवेळा अण्णांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णा आंदोलनावर ठाम राहिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram