नवी दिल्ली : एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूमागे 11 पाईपांचं गूढ!

Continues below advertisement
राजधानी काल एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूनं हादरली... या ११ जणांच्या कथित सामूहिक आत्महत्या प्रकरणासंदर्भातलं गूढ वाढतच चाललंय... हे कुटुंब राहात असलेल्या घरात अनेक रहस्यमय गोष्टी आढळत आहेत. या घरात एका भिंतीत ११ पाइप दिसले आहेत. या पाइपांचं या मृत्यूंशी काय कनेक्शन आहे, याचा तपास केला जात आहे.
घराच्या बाहेरच्या भिंतीवर एका कोपऱ्यात ११ पाइप एकमेकांजवळ लावले आहेत. विशेष बाब म्हणजे या ११ पाइपांपैकी ७ सरळ तर ४ वाकलेले आहेत. मृतांमध्ये ७ महिला आणि ४ पुरुष आहेत. या पाइपांमागे अंधश्रद्धेचा काही ना काही संदर्भ नक्की असल्याचं बोललं जात आहे. कारण या पाइपांमधून पाणी गळण्याची कोणतीही खूण आढळलेली नाही.
या मृतदेहांच्या गळ्याभोवती ज्या ओढण्या गुंडाळल्या होत्या, त्यावरही धार्मिक संदेश लिहिले होते. घरात आढळलेल्या डायरीत पोलिसांना आध्यात्मिक गोष्टी, मृत्यू, मोक्षासंबंधी लिहिलेले आढळले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram