नवी दिल्ली: मुख्यमंत्री-अरुण जेटलींची भेट, सिंचनासाठी राज्याला 10 हजार कोटी
Continues below advertisement
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींची भेट घेतली. अर्थमंत्रालयाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राच्या सिंचन प्रकल्पासाठी 10 हजार कोटींची तत्तवता मंजूरी देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पाला या निधीचा मोठा फायदा होणार आहे
Continues below advertisement