नवी दिल्ली : उपोषणापूर्वी काँग्रेस नेत्यांचा छोले-भटुऱ्यांवर ताव, फोटो व्हायरल
Continues below advertisement
देशभरात दलितांवरील अत्याचारांविरोधात काँग्रेसनं देशभरात लाक्षणिक उपोषण केलं असलं तरी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची लबाडी उजेडात आली आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजन माकन आणि अन्य नेत्यांनी छोले-भटुऱ्यांवर ताव मारल्याचं समोर आलंय. त्याचे फोटोही समोर आले आहेत. त्यामुळे हे उपोषण केवळ दिखावा असल्याची टीका आता भाजपकडून करण्यात येतोय.
Continues below advertisement