स्पेशल रिपोर्ट : नवी दिल्ली : महाभियोगाच्या प्रस्तावावरुन काँग्रेस-भाजपात महानाट्य
Continues below advertisement
आजवर देशात जे घडलं नव्हतं, ते घडवून दाखवायची तयारी काँग्रेसनं सुरु केली होती. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांविरोधात महाभियोगासाठी हालचालींना वेग आलेला होता. त्यासाठी काँग्रेसला इतर 7 पक्षांनीही साथ दिली, महाभियोग प्रस्तावासाठी राज्यसभेत किमान 50 खासदारांच्या सह्या आवश्यक असताना, 71 खासदारांच्या सह्यांचं निवेदनही देण्यात आलं. मात्र अवघ्या दोनच दिवसांत या मोहीमेला ब्रेक लागलाय. राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी 10 पानांचा आदेश जारी करुन महाभियोग प्रस्तावाची नोटीस फेटाळली.
Continues below advertisement