CWC Meet | अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशिवाय इतर नेत्यांचा विचार करा, राहुल गांधींचा प्रस्ताव | ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशिवाय इतर नेत्यांचा विचार केला पाहिजे असा प्रस्ताव खुद्द राहुल गांधी यांनी मांडला. अगदी प्रियंका गांधींचा देखील त्यासाठी विचार होता कामा नये असं मत राहुल गांधी यांनी मांडलंय. मात्र काँग्रेसमधल्या नेत्यांच्या आग्रहाखातर काँग्रेसचं अध्यक्षपद राहुल गांधींकडेच राहणार आहे. दरम्यान राहल गांधींच्या नेतृत्त्वात लोकसभा लढणाऱ्या काँग्रेसला 11 राज्यात भोपळाही फोडता आला नाही. पराभवावर चिंतन करण्यासाठी नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीकडून बैठकीचं आयोजन केलं होतं. राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, मात्र राहुल गांधींकडून राजीनाम्याचा प्रस्ताव मांडण्यापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी त्याला विरोध केला. मनमोहन सिंह यांनी बंददाराआड राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सुत्राकडून मिळतेय. कार्यकारिणीच्या बैठकीला कमलनाथ सोडले तर काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते..
Continues below advertisement