नवी दिल्ली : इस्रोच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ प्रकल्पांसाठी केंद्राकडून 10 हजार कोटींचा निधी

Continues below advertisement
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी भरीव तरतूद केंद्र सरकारनं केली आहे. नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला म्हणजेच इस्रोला केंद्रीय कॅबिनेटकडून १० हजार कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.
पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही या महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्पांसाठी केंद्रीय मंत्रिमडळानं ही तरतूद केली आहे. हे दोन्ही प्रकल्प इस्रोचे बहुउद्देशीय कार्यक्रम आहेत. सध्या इस्रो पहिल्यावहिल्या मानवासहित भारतीय अवकाश वाहनावर काम करत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram