नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 25 लाखांपर्यंत गृहकर्ज 8.5 टक्के दराने
Continues below advertisement
गृहनिर्माण अग्रीम योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना नव्या घरासाठी 8.5 टक्के दरानं 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. यापूर्वी केवळ साडे सात लाखांपर्यंत व्याज सहा ते साडे नऊ टक्के व्याजदरानं मिळत होतं. नगरविकास मंत्रालयाच्या दाव्यानुसार 20 वर्षांसाठी 25 लाखांचं गृहकर्ज देणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत केंद्राच्या योजनेमुळे 11 लाखांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे जर एखादे दाम्पत्य केंद्र सरकारचे कर्मचारी असेल तर त्या दोघांनाही या योजनेचा वेगवेगळा फायदा घेता येऊ शकेल.
Continues below advertisement