नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि पंतप्रधान मोदींची गळाभेट
राजकीय उद्देशानं धर्माचा वापर करुन विभाजनाची दरी निर्माण करणाऱ्यांना थारा नको, देशाच्या एकात्मतेला आव्हान देण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर नेम साधला. ट्रुडो यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमात दोषी खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रित केल्यानं वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ट्रुडो यांच्या भेटीदरम्यान आपलं मत व्यक्त केलं.