नवी दिल्ली : न्या. लोया मृत्यू प्रकरणातील सुप्रीम कोर्टाच्या फैसल्यानंतर भाजपची पत्रकार परिषद
Continues below advertisement
ज्या केसमुळे अवघ्या देशाचं वातावरण ढवळून निघालं त्या न्यायाधीश बी.एच.लोयांच्या मृत्यूच्या चौकशीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. कोर्टाच्या निकालानंतर भाजपने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, या प्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणीही केली.
Continues below advertisement