नवी दिल्ली : प्रणव मुखर्जी आणि आरएसएस वादावर खासदार विनय सहस्रबुद्धे यांची प्रतिक्रिया
ज्या संघाचा महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता, त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाणार आहेत. संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे आणि संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुखर्जी यांनी आमंत्रणाचा स्वीकारदेखील केला आहे.
नागपुरात १४ मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. काल नागपुरात संघाचं संचलनही झालंय. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.