मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं, यशवंत सिन्हांचा सरकारला घरचा आहेर

Continues below advertisement
नोटबंदीविरोधात आता सरकारमधून आवाज उठायला सुरुवात झाली आहे. मंदीच्या काळात नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं असल्याचा घणाघात भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये लिहिलेल्या लेखात यशवंत सिन्हांनी अर्थमंत्री अरुण जेटलींवर तिखट शब्दात निशाणा साधलाय. नोटबंदीनंतर पहिल्या तिमाहीत विकास दर घटून 5.7 टक्क्यांवर गेला आहे. जो गेल्या 3 वर्षातील सर्वात निचांकी आहे. त्याचसोबत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्यानं भडकत आहेत. भरीस भर म्हणून जीएसटीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram