Triple Talaq | तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना काय वाटतं? | ABP Majha

तिहेरी तलाक विरोधी विधेयक अखेर लोकसभेच्या पटलावर मांडण्यात आलंय. विरोधकांच्या गोंधळामुळे  विधेयक लोकसभेत मांडावं की नाही यावर मतदान घेतलं गेलं. ज्यात विधेयकाच्या बाजूनं 186 तर विधेयक मांडण्याविरोधात 74 मतं मिळाली.  तिहेरी तलाकविरोधी विधेयकातल्या काही तरतुदी या घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. तर हे विधेयक म्हणजे मुस्लिम महिन्यांना न्याय देणारं विधेयक असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. यंदा तिसऱ्यांदा हे विधेयक लोकसभेच्या पटलावर आलंय. याआधीच्या मोदी सरकारमध्येही हे विधेयक दोन वेळा लोकसभेत आलं होतं. मात्र  लोकसभेत विधेयक पास झाल्यावर राज्यसभेत हे विधेयक अडकलं होतं. मात्र आता पुन्हा मोदी सरकार या विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेची मंजुरी आवश्यक असणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram