
नवी दिल्ली : पालघर पोटनिवडणुकीत एका रात्रीत 7 टक्के मतं कशी वाढली? : अरविंद सावंत
Continues below advertisement
पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत 6.72 टक्के मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केला आहे. 'सामना'मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. पालघरमधील मतदान पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि बूथवरील माहिती गोळा केली. त्यानंतर एकूण 46.50 टक्के इतकं मतदान झाल्याचं जाहीर केलं. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी अचानक पत्रक काढून हे मतदान 53.22 टक्क्यांवर गेल्याचं सांगण्यात आलं. मतदानाच्या आकडेवारीत फार फार तर 1 ते 2 टक्क्यांचा फरक पडू शकतो. मात्र ही सहा टक्के मतं एका रात्रीत कुठून वाढली? असा सवाल करत निवडणूक प्रक्रियेवर शिवसेनेनं संशय व्यक्त केला आहे.
Continues below advertisement