नवी दिल्ली | विजया बँक, देना बँक, बँक ऑफ बडोदाचं विलीनीकरण होणार

केंद्र सरकारने सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँका, बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांचं विलीनीकरण करण्याची घोषणा केली. या विलीनीकरणानंतर देशातील तिसरी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल. हे विलीनीकरण कर्ज देण्याची क्षमता वाढवणे तसेच, आर्थिक विकास दर वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

गेल्या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडियाचं पाच सहकारी बँकांसोबत विलीनीकरण झाल्यानंतर देशातील सर्वात मोठी बँक निर्माण झाली होती. यासोबतच महिलांसाठी असलेल्या भारतीय महिला बँकेचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता. या निर्णयामुळे बँका आणखी मजबूत होतील, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विलीनीकरणाची घोषणा करताना सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola