Rahul Gandhi Tweet | राहुल गांधींकडून आंतरराष्ट्रीय योगदिनाची खिल्ली, जवानांचाही अपमान केल्याचा आरोप | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश-विदेशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देश फिट राहावा यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. एकीकडे योग दिनाचा उत्साह असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मात्र योग दिवसाची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट करत योग दिनानिमित्त सुरु असलेल्या विविध कार्यक्रमांवर टीका केली आहे. राहुल गांधींनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे, त्यामध्ये भारतीय जवान श्वानांसोबत योग करताना दिसत आहेत. यावेळी श्वान देखील योग करत आहेत. या फोटोला राहुल गांधींनी 'न्यू इंडिया' असं कॅप्शन दिलं आहे. मात्र या ट्वीटवरून राहुल गांधींना नेटिझन्स टार्गेट करत आहेत.