अविश्वास प्रस्ताव: कुणाच्या बाजूने किती मते

Continues below advertisement
मोदी सरकारविरोधातला पहिला अविश्वास ठराव लोकसभेत पडला. सरकारच्या बाजूने 325 मतं पडली, तर विरोधकांच्या बाजूने केवळ 126 सदस्य होते. एकूण 451 सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. बीजेडी आणि शिवसेनेने मतदानाला गैरहजेरी लावली.

संख्याबळ पाहता विरोधकांचा पराभव होईल, हे पहिल्यापासून निश्चित होतं. अविश्वास ठरावाच्या निमित्ताने विरोधकांनी आपल्या एकजुटीची परीक्षाही घेतली. तर सत्ताधारी एनडीएनेही 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कोण-कोण आपल्यासोबत आहे याची चाचपणी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram