नवी दिल्ली : अण्णा हजारेंचं उपोषण सातव्या दिवशी मागे, बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य

Continues below advertisement
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलप्राशन करुन अण्णांनी उपोषण सोडलं. यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते.

अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या सरकारने तत्वत: मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या वाचून दाखवल्या.

जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु होतं. 23 मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती.

मात्र अण्णा हजारेंची प्रकृती खालावली होती. त्यांचं वजन पाच किलोंपेक्षा कमी झालं होतं. तर रक्तदाबही कमी झाला होता. यांनंतर सरकारने वेगाने हालचाली करत सुरुवातील गिरीश महाजन यांच्याकडे मध्यस्थीची जबाबदारी दिली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले आणि रामलीला मैदानावर जाऊन अण्णांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कामी आली आणि अण्णांनी उपोषण सोडलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram