ब्रेकफास्ट न्यूज : दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद!
Continues below advertisement
देशातील बहुतांश राज्यांमध्ये रोख रकमेची मोठ्या प्रमाणावर चणचण भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांच्या अतिरिक्त छपाईवर भर देण्यात आला आहे. तर दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई थांबवण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी दिली. सध्या दोन हजार रुपयांच्या सात लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात आहेत. हे प्रमाण पुरेसे आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे.
Continues below advertisement