दिवाळीनिमित्त नेपाळमध्ये श्वानांचीही पूजा | काठमांडू | एबीपी माझा
Continues below advertisement
जगभरातल्या अनेक देशांमध्ये सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय.. नेपाळमध्येही श्वानांची पूजा अर्चना करून लोकं दिवाळी अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करताना पाहायला मिळतायत. नेपाळमध्ये दिवाळी तिहार या नावाने ओळखली जाते. या दिवसांत श्वानांना विशेष महत्व असतं. कुत्रा आणि मनुष्य यांच्यातलं मैत्रीचं नातं कायम टिकावं यासाठी तिहारच्या दिवसांत श्वानांची मनोभावे पूजा केली जाते. नेपाळमधल्या काही भागांमध्ये कावळा आणि गायींचं पूजन केलं जातं. याठिकाणी पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते. नेपाळच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात यानिमित्ताने विशेष परेड आयोजित करण्यात येते..
Continues below advertisement