Supriya Sule | कुठलाही राजकीय पक्ष एका कुटुंबाची मक्तेदारी नाही : सुप्रिया सुळे | तोंडी परीक्षा | ABP MAJHA
मुंबई : शरद पवारांचा राजकीय आणि वैचारिक वारसदार येणारा काळ ठरवेल. तो वारसदार पक्ष आणि कार्यकर्ते ठरवतील. कुठलाही राजकीय पक्ष एका कुटुंबाची मक्तेदारी नाही, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. त्या एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात बोलत होत्या. शरद पवार यांचा राजकीय आणि वैचारिक वारसदार कोण? असा प्रश्न विचारला असता त्यांनी कुठल्याही पक्षावर एका कुटुंबांची मक्तेदारी नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार शरद पवार ठरले. वारसदार होणे हे काही शेअर्स नाहीत. तो वारसा कुणालाही मिळू शकतो, ते काळ आणि पक्ष ठरवेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.