हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची लखनऊत गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीए.. तिवारी यांच्या कार्यालयाजवळ तीन अज्ञात एका गाडीवर आले होते. कमलेश तिवारी यांना भेटवस्तू देण्याच्या निमित्ताने ते त्यांच्या कार्यालयात शिरले. तिथे त्यांनी कमलेश तिवारींवर गोळी झाडली आणि पळ काढला. या प्रकरणानंतर लखनऊमध्ये तणाव आहे. बाजारपेठेतील सगळी दुकानं बंद करण्यात आली आहेत.