मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका | अजित पवार UNCUT | बारामती | एबीपी माझा
मला भावी मुख्यमंत्री व पवार साहेबांना भावी पंतप्रधान म्हणू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे. कार्यकर्त्यांकडून चांगल्या भावनेतून माझा भावी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख केला जातो. पण हा उल्लेख टाळावा या उल्लेखामुळे मित्रपक्षातल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावू शकतात, असेही अजित पवार म्हणाले.