नवी मुंबई : समान काम-समान वेतनाच्या मागणीसाठी मनसे कामगार सेना आक्रमक
Continues below advertisement
समान काम - समान वेतन या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आक्रमक झालीय. या संदर्भात मनसे कामगार संघटनेनं आंदोलन छेडलं असून, त्यांनी ऐरोली आणि कोपरखैरणेतील कचरा उचलणं बंद केलंय. तसंच आक्रमक झालेल्या आंदोलकांनी कचरा उचणाऱ्या घंटा गाडीचीही तोडफोड केलीय. कामगारांना समान काम - समान वेतन देण्याची मागणी मनसेची कामगार संघटना गेल्या काही दिवसांपासून करत आहे. मात्र, सरकार आणि पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय. त्यामुळे मनसे कामगार संघटनेकडून या मागणीसाठी आंदोलन छेडलंय.
Continues below advertisement