स्पेशल रिपोर्ट : नवी मुंबई : वाशीतील एमजीएम रुग्णालयावर सायबर हल्ला
Continues below advertisement
वाशीतील एमजीएम रुग्णालयाची संपूर्ण माहिती अज्ञात हॅकरने हॅक केली आहे. यंत्रणा पूर्ववत करायची असेल तर हॅकर्सनी बिटकॉइनद्वारे खंडणी द्या, अशी अट घातली आहे. या सायबर हल्ल्यात रुग्णालयाची मागील 15 दिवसांची माहिती चोरीला गेली आहे. याबाबत तक्रार देण्यात आली असून अज्ञात हॅकर्सविरोधात आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात खारघर येथील थ्री स्टार हॉटेलची संपूर्ण यंत्रणा अशाच पद्धतीने हॅक करण्यात आली होती. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनाकडे 400 यूएस डॉलर आणि बिटकॉइनची मागणी करण्यात आली होती.
Continues below advertisement