नवी मुंबई : 'आधार'साठी खारघरमध्ये मध्यरात्रीपासून रांगा, खासगी केंद्रं बंद केल्यानं लोकांना मनस्ताप

Continues below advertisement
तुम्हाला आधार कार्ड काढण्यासाठी तासनतास रांगेत थांबावं लागलं असेल. मात्र, नवी मुंबईत आधार कार्ड काढण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगा लागत आहेत. खारघर, वाशी परिसरातील सिंडिकेट बँकेसमोर आधार कार्ड काढण्यासाठी तुफान गर्दी झालीय. खरं तर बँक सकाळी 10 वाजता बँक उघडते. मात्र आपलं काम लवकर होण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे बँक एका दिवसाला फक्त तीस आधार कार्ड देत आहे. त्यामुळे लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. आधार कार्डमध्ये होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी सध्या बँक आणि पोस्ट ऑफिसमध्येच आधार कार्ड मिळतंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram