नवी मुंबई : मराठा आंदोलनात हिंसा पसरवणारे 56 जण ताब्यात, अनेकजण परप्रांतीय
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा घडवणाऱ्या 56 जणांना नवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कळंबोली, वाशी, कोपरखैरणे आंदोलनातील काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक जण परप्रांतीय असल्याचे उघड झाले आहे. मराठा आंदोलनात या परप्रांतीयांना हिंसाचार करण्यासाठी कोणी पाठवलं? याचा तपास पोलीस आता करत आहेत. आंदोलनात घुसलेल्या समाजकंटकांनी काल संध्याकाळी सात वाजल्यानंतर अंधाराचा फायदा घेत कोपरखैरणे गावात घुसून येथील नागरिकांच्या 100 हून अधिक गाड्या फोडल्या, तसेत घरांवरही दगडफेक केली. दगडफेक करणारे कोपरखैरणेमधील नसून बाहेरुन आले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. समाजकंटकांनी कोपरखैरणे गावात शिरुन ग्रामस्थांच्या घरांची आणि गाड्यांची तोडफोड केल्याने स्थानिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.
Continues below advertisement