हैदराबाद : आयआरएनएसएस-1 उपग्रहाचं श्रीहरीकोट्यातून यशस्वी प्रक्षेपण
Continues below advertisement
इस्रानं आज आपला नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात सोडला. याआधी निरिक्षण उपग्रह जीसॅट-६एच्या सोडण्यात इस्रो अपयशी ठरलं होतं. अवघ्या २४ तासात या उपग्रहाशी संपर्क तुटला होता. मात्र यंदा अधिक मेहनत घेऊन इस्रोनं आयआरएएसएस-१ या उपग्रहाचं यशस्वी लॉन्चिंग केलं. आज पहाटे ४ वाजता आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोट्टामधून हा उपग्रह लॉन्च करण्यात आला. या उपग्रहामुळं देशाच्या जीपीएस सिस्टीमला मजबुती मिळणार आहे. शिवाय सैन्यासाठी हा उपग्रह मोठी मदत करणार आहे.
Continues below advertisement