नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याला कवडीमोल दर
Continues below advertisement
नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजारसमीतीत शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला अक्षरश: कवडीमोल दर मिळतोय. गेल्या दोन दिवसांपासून मार्केटमध्ये तब्बल 650 ते 700 गाड्यांची आवक होत असल्याने दर उतरले आहेत. घाऊक बादारात 15 रुपये किलोंनी विकला जाणाऱ्या भाजीपाल्याला प्रतिकिलोला अवघा 7 ते 10 रुपये दर मिळतोय. त्यातच उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने ग्राहकांची संख्याही रोडवली आहे. परिणामी मार्केटमधील भाजीपालाही शिल्लक राहत आहे. दरम्यान, घाऊक बाजारात भाजीपाला स्वस्त मिळत असलातरी सर्वसामान्यांसाठी भाजी महागच मिळत आहे.
Continues below advertisement